अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील वीज उपकेंद्राकडे मागील तीन वर्षाचा मालमत्ता कर थकीत आहे.
थकबाकी भरणा न केल्याने ग्रामपंचायतीने अखेर सात दिवसात थकीत कर भरणा न केल्यास वीज उपकेंद्र सील करण्याची नोटीस दिली आहे.

दरम्यान तालुक्यातील चिलेखनवाडी येथे उपकेंद्र स्थापन झाल्यापासून ग्रामपंचायत सदर उपकेंद्राकडून मालमत्ता कर वसूल करते. परंतु वेळोवेळी मागणी बील देऊनही महापारेषन कंपनीने भरणा केलेला नाही.
ग्रामपंचायतची मागील तीन वर्षाची 4 लाख 77 हजार 811.47 रुपये थकबाकी भरणा न केल्याने पदाधिकाऱ्यांनी उपकेंद्र सील करण्याचा निर्णय घेतला .
ऐन नवरात्र उत्सवात उपकेंद्र सील केल्यास येथून वीजपुरवठा होणारी देवसडे, तेलकुडगाव, अंतरवाली, वडुले, कुकाणा, सुकळी, नांदूर शिकारी, पिंपरी शहाली, पाथरवाले, इत्यादी गावे अंधारात जाणार असल्याची भीती निर्माण झाली आहे.
थकीत रक्कम जमा करून कटू कारवाई टाळावी असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र अद्यापही रक्कम भरली न गेल्याने अखेर ग्रामपंचायतने हा निर्णय घेतला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम