जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! अवघ्या 48 तासात 16 वाहनांची केली चोरी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे. कारण जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक दहशतीखाली वावरू लागले आहे.

तर चोरटे मात्र निर्धास्त आहे. यामुळे चोरट्यांवर अंकुश लावण्यात पोलीस यंत्रणा अयशस्वी ठरते असल्याचे दिसून येत आहे.

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात चोर्‍याघरफोड्यांबरोबरच दुचाकी-चारचाकी वाहने चोरणार्‍या टोळ्या सक्रीय झाल्यासारखी परिस्थिती दिसून येत असून दोन दिवसात तब्बल 13 दुचाक्या, 2 महागड्या कार व 1 ऑटो रिक्षा चोरीला गेल्याचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.

यात अहमदनगर शहर परिसरातून 6 दुचाक्या, 2 कार व एक ऑटो रिक्षाचा समावेश आहे. नगर शहरात मध्यंतरी कोतवाली पोलिसांनी दुचाक्या चोरांची टोळी उघडकीस आणली होती. परंतु तरीही वाहने चोरीला जाण्याचे प्रकार

काही थांबलेले नाहीत त्यामुळे या वाहन चोरांच्या वेगवेगळ्या टोळ्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2 दिवसात जिल्ह्यातून 13 दुचाक्या चोरीला गेल्या आहेत.

नागरिकांनी रस्त्यावर लावलेल्या मोटारसायकली, रुग्णालयाबाहेर, मंगल कार्यालयाबाहेर लावलेल्या मोटारसायकली चोरटे सहज चोरतात.

या टोळ्या गजाआड करणे, वाहन चोऱ्या पोलिसांना रोखता आलेल्या नाहीत. असले तरी मोटारसायकली चोरी जात आहे. त्यामुळे वाहनधारक ही त्रस्त झालेले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe