ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ‘या’ दिवशीपासून पुकारणार कामबंद आंदोलन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :-  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या प्रलंबित मागण्यांबाबत आता कर्मचारी युनियनने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, शाखा अकोले २१ ऑक्टोबर पासून पंचायत समिती, अकोले समोर बेमुदत कामबंद व धरणे आंदोलन करणार आहे.

दरम्यान याबाबतची माहिती युनियनचे तालुकाध्यक्ष संदीप घोडके यांनी दिली आहे. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनकुसळे यांना निवेदन दिले.

नेमक्या काय आहेत मागण्या? जाणून घ्या वाढीव किमान वेतन मिळावे, किमान वेतनातील फरक मिळावा, थकीत तसेच चालू राहणीमान भत्ता मिळावा, भविष्य निर्वाह निधी रक्कमेत ग्रामपंचायत हिस्सा जमा करावा, सेवा पुस्तक अद्ययावत करावे,

सानुग्रह अनुदान व ड्रेस कोड दीपावली पूर्वी मिळावेत, सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा उतरविणे, ग्रामपंचायत कर्मचारी,

ग्रामसेवक यांच्यासमवेत बैठक आयोजीत करणे या मागण्याचा येत्या ८ दिवसांत योग्य तो निर्णय न घेतल्यास गुरूवार दि. २१ ऑक्टोबर २०२१ पासून सकाळी ११ वा. पंचायत समिती, अकोले समोर बेमुदत काम बंद व धरणे आदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News