अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्या विरोधात काल रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात आईपीसी 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
हा सर्व विषय पोलीस खात्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 676 दाखल झालेला असून आरोपीला अजून अटक झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
थेट एका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील कर्मचारी शकील सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने शहर आणि जिल्हा वर्तुळात खळबळ उडाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम