अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळया ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. विशेषबाब म्हणजे या ऑडिओ क्लिपवरून जिल्ह्यासह राज्यातील वातावरण ढवळून निघेल आहे.
पारनेर मधील ऑडिओ क्लिप गेल्यानंतर आता नुकतेच नेवासा पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. मात्र आता या प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
नेवासा पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेला काम करणारे पोलीस कर्मचारी किरण गायकवाड यांची पारनेर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी पोलीस कर्मचारी व वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांच्या संभाषणाची एक ऑडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही बदली केली आहे. नेमके काय आहे हे प्रकरण ? जाणून घेऊया सविस्तर… नेवासा पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेला काम करणारे पोलीस कर्मचारी किरण गायकवाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
या ऑडीओ क्लीप मधील पोलीस कर्मचारी एका प्रवासी वाहतूक संघटनेच्या उपाध्यक्षावर खोटा अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचे या संभाषणातून समोर आले आहे.
या क्लिपद्वारे वाहतूक शाखेत चालणारी हप्तेखोरी उघड झाली. अवैध प्रवासी वाहतूक व यातून पोलिसांना दिले जाणारे हप्ते या संभाषणातून अधोरेखित झाले आहे.
यानंतर नेवासा तालुक्यमधील काही वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यानुसार अधीक्षक पाटील यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या बदली बाबत आदेश काढले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम