अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटांसह शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
एवढेच नाही तर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात वीज पडून दोन बैल व एक गाय ठार झाले असल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वैजापूर तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या शनिदेवगाव येथील अशोक बाळा मेघळे यांची जवळच शेती आहे.
वैजापूर तालुक्यातील देवगाव शिवारात माध्यमिक विद्यालयाशेजारी मेघळे यांची लिंबाखाली पावसात तीनही जनावरे पावसात आश्रयास होती. घटनास्थळाजवळच मुलगा गणेश मेघळे पत्र्याचे पढवीत होता. अचानक संध्याकाळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पाऊस सुरु झाला.
पावसातच झाडावर वीज पडून दोन बैल व एक गाय हे मृत्युमुखी पडले. सुदैवाने मानवजिवीत हानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे मेघळे यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे.
घटनेची खबर वैजापूर तहसिलदार यांना देण्यात आली असून पंचनामास्थळी महसूल अधिकारी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी, पोहचले नव्हते.
अचानक वादळी वारे अन् मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडली तर ऊस पीके भुईसपाट झाली. दरम्यान आर्थिक हानी पोहचलेल्या या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होऊ लागली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम