Beauty tips in marathi निरोगी त्वचेसाठी आयुर्वेदिक उपाय उपयुक्त

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- वेगाने धावणाऱ्या जीवनात आपण आपल्या नाजूक त्वचेकडे दुर्लक्ष करतो. ज्यामुळे ती आपल्यावर रुसते. चमक आणि कांतीने आरोग्यपूर्ण त्वचा मिळविण्यासाठी आयुर्वेद सहायक ठरते.

beauty tips in marathi

कसं ते बघूया . . . आहारातील पौष्टिकतेअभावी आपली त्वचा शुष्क आणि पिवळी पडते. ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येतात. जर दीर्घकाळ त्वचेकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा तिची नैसर्गिक चमक गमावून बसते. तसंच विषारी द्रव्यांच्या आधिक्यामुळे त्वचा संक्रमित ही होते.

त्वचेला पोषण कसे मिळेल ? :- आयुर्वेदात ट्रेनिंग ट्रिटमेंट आणि त्वचा थेरपीच्या माध्यमातून त्वचेला निरोगी ठेवता येते. त्वचेला पौष्टिकता देण्यासाठी आयुर्वेदिक जडी-बुटी आणि आयुर्वेदिक तेलाच्या मिश्रणाने मसाज करा. यामुळे विषारी पदार्थ हळूहळू बाहेर निघतील.

त्वचेची प्रकृती :- आयुर्वेदाने त्वचेला तीन भागांमध्ये विभागले आहे. वात, पित्त आणि कफ. वाताचं आधिक्य असणारी त्वचा रूक्ष असते, तिच्यावर लवकर सुरकुत्या पडतात.

पित्ताने युक्त त्वचा अधिक संवेदनशील असते आणि मुलामय असल्यामुळे त्यावर अनेकदा रॅशेस येतात. कफाचं आधिक्य असणारी त्वचा तेलकट आणि थंड असते. अशा त्वचेवर विषारी पदार्थ पटकन जमा होतात ज्यामुळे मुरूम पटकन येतात.

उजळ त्वचेसाठी पिकलेलं केळ : – केळ त्वचेसाठी खूप चांगला स्रोत आहे. पिकलेलं केळ छान स्मॅश करा. ते चेहऱ्यावर फेसपॅक प्रमाणे लावा. पंधरा मिनिटांनंतर धुवा. चेहरा धुतल्यानंतर चंदनाचा लेप लावा. यानंतर त्वचा खूप उजळ दिसते.

नारळपाणी : – नारळपाणी खुपच गुणकारी ठरते. म्हणून दररोज नारळपाणी पिण्याने चेहरा चमकू लागतो. नारळ पाण्याने चेहरा धुण्याचे डाग नाहीसे होतात. नारळाची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.

मध रामबाण : – मधाचा फेसपॅक फायदेशीर ठरतो. बेसन, मध, जैतून, दुधाची साय एकत्र मिसळून चेहऱ्याला लावा. यामध्ये तीन चमचे बेसन आणि इतर घटक एक चमचा या प्रमाणात घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटानंतर चेह धुवून टाका.

 छोटे उयाय मोठे फायदे : –

  • खूप पाणी प्या, पालेभाज्या भरपूर खा
  • पूर्ण झोप होईल यासाठी प्रयत्नशील राहा
  • तणावापासून दूर राहा
  • झोपताना चेहऱ्यावरील मेकअप काढा
  • कृत्रिम सौंदर्यप्रसाधनांची दूर ठेवा
  • नैसर्गिक मॉईरचराइझरचा वापर करा.
  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
  • फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe