पाऊस आला म्हणून ‘ते’ झाडाखाली बसले अन नेमकी तिथेच वीज कोसळली…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-   जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाबरोबरच विजेचा कडकडाट सुरु आहे. यातच अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

यामध्ये काहींचा मृत्यू देखील झाला तर काही जण गंभीर जखमी झाले आहे. नुकतेच अशीच एका घटना राहुरी तालुक्यात घडली आहे.

राहुरी तालुक्यातील पाथरे शिवारात कापूस वेचणी करणाऱ्या टोळीतील दोन शेतमजुरांवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. यात शेतमजुरांवर गंभीर इजा झाली असून दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पाथरे शिवारात ज्ञानेश्‍वर आप्पासाहेब जाधव या शेतकर्‍याच्या शेतात बारा शेतमजुर कापूस वेचणी करत होते.

दरम्यान पाऊस आल्यामुळे बारा शेतमजूर भोकराच्या झाडाखाली बसले असता शब्बीरभाई जानूभाई पठाण व हिराबाई रामदास बाचकर या दोघांच्या अंगावर वीज कोसळली.

यात शब्बीरभाई जानूभाई पठाण यांच्या पाठीला व पायाला गंभीर जखमा झाल्या तर हिराबाईच्या अंगावर लोळ उडाले. त्यांना श्रीरामपूर येथे एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची खबर तहसीलदारांना देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe