गरोदरपणाची गरज आहे भरपूर पोषण

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- गर्भावस्थेत भावी आईने केवळ आपल्यासाठीच नव्हे तर गर्भात वाढणाऱ्या बाळाचा विचार करून पोषक आहाराचे सेवन करायला हवं. याविषयी अधिक विस्ताराने जाणून घ्या.

गर्भवती महिलेचा आहार प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्व आणि पोषक घटकांनी भरलेला असावा. जर गरोदरपणात अशा आहाराचं सेवन केलं तर गर्भावस्थेशी संबधित जटिलतांचा धोका कमी करण्यास मदत होते. गर्भधारणेमुळे महिलेच्या स्वभावात आणि जीवनशैलीत अनेक बदल होतात.

यादरम्यान अनेक जणींना काही खावसं वाटत नाही. पण गर्भावस्थेत आपल्या आहाराकडे लक्ष देणे सर्वांत महत्त्वाचे आहे. कारण आईचा आहार गर्भस्थ शिशूच्या निर्मितीचा आधार बनतो. तज्ज्ञांच्या मते, गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या टप्प्यात डाएट प्लान तयार करा. यासाठी तुम्ही डॉक्टरांशी बोलू शकता.

लक्षात ठेवा, डॉक्टर आपल्या आणि आपल्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्य विषयी अधिक चांगलं जाणतात. गर्भवतीच्या आहारात फायबर, प्रथिनं, कॅल्शियम, लोह, फॉलेट, लोह घटक आणि अन्य पोषक घटक असायला हवेत. गर्भवती महिलांनी आपल्या शरीरात कॅल्शियमच्या पूर्ततेसाठी दूध आणि दुग्धजन्य खाद्यपदार्थांचे सेवन करायला हवे.

» फायबर्स नी समृद्ध धान्य : – आख्ख्या धान्यांमध्ये फायबर्स, जीवनसत्व, कर्बो दके भरपूर असतात. यामुळे अन्न सहज पचते. फायबर्सयुक्त आहाराने गर्भावस्थेत अपचन, मूळव्याध यांसारख्या समस्यांचा धोका कमी असतो. कोंड्यासह गव्हाचं पीठ, ज्वारी, बाजरी, मका, ओट्स याचे उत्तम स्रोत आहेत.

» डाळीचे आवश्यक : – जर तुम्ही मांसाहार करत नसाल तर डाळी तुमच्यासाठी प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत. शाकाहारी व्यक्तींनी प्रथिनांसाठी ४५ ग्रॅम सुकामेवा आणि २-३ कप डाळी किंवा कडधान्यं यांचा आहारात समावेश करावा. तुम्ही हरभरा, राजमा, शेंगदाणे, बीन्स, सोयाबीन, मूग यांसारख्या अनेक डाळी तुमच्या सुविधेनुसार आहारात समाविष्ट करू शकता.

» पालेभाज्या : – गर्भवतींनी आपल्या प्रत्येक आहारात पालेभाज्या म्हणजे पालक, ब्रोकोली, सोया, मेथी इत्यादीचा समावेश करायला हवा. यामध्ये लोह, अ; क जीवनसत्त्व, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

» दूध आणि दुग्धजन्य पदार्थ : – दूध आणि अन्य दुग्धजन्य पदार्थ यातून मिळणारे कॅल्शियम भ्रूणाच्या मजबूत हाडांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. जर तुम्ही शाकाहारी असाल तर प्रथिनांचा सर्वोत्तम स्त्रोत पाश्चराइज्ड दूध आहे. त्याचबरोबर दुग्ध उत्पादनं म्हणजे दही, पनीर इत्यादीमध्येही प्रथिनं भरपूर असतात. दही एक सुपरफूड आहे. रायत्याशिवाय ताक हा सुद्धा उत्तम पर्याय आहे.

» अंडी सुपरफूड : – अंड्यातून भरपूर प्रथिने मिळतात. दररोज कमीत कमी दोन अंडी खायला हवीत. गर्भावस्था भ्रूणाच्या निरंतर विकासाचा टप्पा असतो. भ्रूणाच्या शरीराच्या पेशी, त्वचा, अंग आणि ऊतींच्या निर्मितीसाठी प्रोटीनच्या पूर्ततेची सातत्याने गरज असते.

» मेंदूच्या निर्मितीसाठी सुकामेवा : – सुकयामेव्यातील प्रथिनं बाळाच्या मानसिक विकासासाठी खूप आवश्यक असतात. यामध्ये पुरेशा प्रमाणात फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, जीवनसत्त्व अ, ब ६, क आणि ड असते. मनुका, अंजीर, बदाम.

» लक्षात ठेवा : –

० आवळा खा, यामध्ये क जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

० धान्यं, डाळी, मासे आणि दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावं.

० पालेभाज्या, सोया दूध, टोफू, तीळ, सुकामेवा आणि आख्खी धान्यं यांचं सेवन भरपूर करा.

० रताळं अवश्य खा.

० कॉड लिव्हर ऑइल, यामध्ये ओमेगा ३ आणि ड जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.

० पाणी आणि ताज्या फळांचा रस.

० तूप, लोणी, नारळाचं दूध यामध्ये संतृप्त फॅट्सचं प्रमाण अधिक असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe