क्रुझ ड्रग्स प्रकरणी रोहित पवार म्हणाले…’मी त्यालाही ओळखत नाही

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :-   राज्यासह देशात सध्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि क्रुसजवर रंगलेली ड्रग्स पार्टीची चर्चा चालू आहे.

माध्यमांनी हे प्रकरण खूपच उचलून धरले आहे. याप्रकरणावर अनेकांनी आपली मत व्यक्त केली. यातच कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणावर आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार नेमके काय म्हणाले? जाणून घेऊ ‘मी त्यालाही ओळखत नाही आणि कुठल्या अभिनेत्यालाही ओळखत नाही. मात्र कोणावर कारवाई होत असेल, तर सगळ्यांना समान न्याय असायला हवा.

एनसीबीच्या कारवाईत काही भाजपाचे कार्यकर्ते होते. हे पाहाता काहीतरी चुकतंय का? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उभा राहत आहे. त्याची उत्तरं दिलीच पाहिजे.

कोणतीही कारवाई राजकीय हेतूनं न होता योग्य पद्धतीने व्हावी’, असं रोहित पवार यांनी म्हटलं. नेमके काय आहे हे प्रकरण? मुंबई-गोवा-मुंबई जाणाऱ्या क्रुझवर एनसीबीनं शनिवारी छापा टाकला या क्रुझ ड्रग्ज प्रकरणात टाकलेल्या या छाप्यात एनसीबीनं अनेकांना ताब्यात घेतलं आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनसह सात जणांना अटक केली होती. याप्रकरणी आता एकूण 19 जणांना अटक करण्यात आलं. परवाच याप्रकरणी एनसीबीनं चित्रपट निर्माता इम्तियाज अलीच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.

शाहरुखच्या मुलाला झालेल्या या अटक प्रकरणी देशभरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. अशातच आता याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe