Ahmednagar Corona Update : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या सविस्तर अपडेट्स

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज ३६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४० हजार ५३१ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३२७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ७६२ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १९०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८० आणि अँटीजेन चाचणीत ५७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये अकोले १०, जामखेड ०२, कर्जत १६, नगर ग्रामीण ०४, पारनेर ४९, पाथर्डी ०१, राहता ०३, राहुरी ०३, संगमनेर ९५, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, अकोले ०२, जामखेड ०१, कर्जत ०१, नगर ग्रा. १२, नेवासा ०५, पारनेर ०७, पाथर्डी ०४, राहता ०७, राहुरी ०४, संगमनेर ०८, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ५७ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले ०२, कर्जत १०, कोपरगाव ०९, नगर ग्रा. ०३, नेवासा ०३, पारनेर ०८, पाथर्डी ०५, राहता ०१, राहुरी ०९, शेवगाव ०२ आणि श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ०८, जामखेड ०५, कर्जत १८, कोपरगाव २१, नगर ग्रा. १८, नेवासा २६, पारनेर ५४, पाथर्डी १४, राहाता ०६, राहुरी १४, संगमनेर ११५, शेवगाव १४, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर १६ आणि इतर जिल्हा २२ अशा रुग्णांचा समावेश आहे

बरे झालेली रुग्ण संख्या:३,४०,५३१

उपचार सुरू असलेले रूग्ण:२७६२

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६९३४

एकूण रूग्ण संख्या:३,५०,२२७

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe