निवडणुकीचे बिगुल वाजले ! नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळासाठी ‘या’ दिवशी मतदान होणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- गैरव्यवहारामुळे नगर अर्बन बँक गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय राहिली आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे नगर अर्बन मल्टिस्टेट शेडय़ुल्ड बँकेच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 30 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

तब्बल दोन वर्षांनी ही निवडणूक होत आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून बँकेतील गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

2019 मध्ये या बँकेची निवडणूक अपेक्षित होती. मात्र, बँकेचा एनपीए वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. बँकेवर सुमारे दोन वर्षांपासून ‘प्रशासक राज’ सुरू आहे. या निवडणुकीमुळे आता ‘प्रशासक राज’ संपणार आहे.

जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी आज सकाळी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. 28 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 30 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुकीचा अधिकृत निकाल 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाईल.

बँकेच्या 18 जागा असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. 3 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

वैध उमेदवारी अर्जांची यादी 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार असून, 15 नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe