अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- एका अहवालानुसार देशात २०२०मध्ये सुमारे ७.१२ लाख महिलांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला. तर कॅन्सरने मरणाऱ्या पुरुषांची संख्या ७ लाखांपेक्षा कमी होती.
या आजारांचे महिलांना त्रास देण्याचे कारण त्यांची शारीरिक ठेवणही सहा प्रकारचे कॅन्सर महिलांना पुरुषांपेक्षा जास्त होतात. स्ट्रोकचा केसेसही दुप्पट. तसे तर आजार महिला आणि पुरुषांमध्ये फरक करीत नसतात, पण असे अनेक आजार आहित जे पुरुषांच्या तुलनेत महिलांवर जास्त परिणाम करीत असतात.
यामध्ये एंग्झायटी, ब्रेस्ट कॅन्सर, स्ट्रोक, ऑस्टियोपोरोसिस हे चार आजार ही असेच आहित. शोध सांगतात की, सहा प्रकारचे कॅन्सर महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त होत असतात.
तर स्ट्रोकचा केसेसही महिलांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट आढळून आल्या आहेत. एका अहबालानुसार देशात २0२0 मध्ये सुमारे ७.१२ लाख महिलांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला. तर कॅन्सरने मरणाऱ्या पुरुषांची संख्या ७ लाखांपेक्षा कमी होती.
या आजारांचे महिलांना त्रास देण्याचे कारण त्यांची शारीरिक ठेवणही आहे. तशी याशिवायही अनेक कारणे आहेत जी त्यांना या आजाराबाबत जास्त संवेदनशील बनवतात.
० एंग्झायटी : दर सातपैकी एक यामुळे पीडित : – द लॅसेंट सायकियाट्रीच्या रिपोर्टनुसार देशात दर सातपैकी एक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक विकाराने पीडित आहे. देशात ३.९% महिला आणि ३.३% पुरुष एंग्झायटीच्या समस्येने पीडित आहेत.
» कारणे : – हार्मोन्समध्ये होणारे बदल, आजार, आनुवंशिकता, लैंगिक छळ, घरगुती हिंसाचार इ.
» कसा टाळावा : – संतुलित आहार घ्यावा. जर घेऊ शकत नसाल तर मल्टिव्हिटॅमिन घ्या. मद्य, कॅफीन आणि साखर कमी घ्या. रोज २0 मिनिटे फिरा व आनंद देईल असे कोणतेही काम करा.
० ऑस्टियोपोरोसिस : १८% जास्त : – इंडियन जर्नल ऑफ इंडोक्रिनालॉजी अँड मेटाबॉलिज्ममध्ये प्रकाशित शोधानुसार ५0 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २४.६% पुरुष तर ४२.५% महिलांमध्ये ऑस्टियोपोरोसिसची समस्या आढळले आहे.
» कारणे : – महिलांची हाडे पुरुषांच्या मानाने कमकुवत असतात. हाडांना प्रोटेक्ट करणारे हार्मोन अँस्ट्रोजेन मोनोपॉजनंतर वेगाने कमी होते.
» कसा टाळावा : – नियमित दुधापासून बनवलेले खाद्य पदार्थांचे सेवन करावे. कॅल्शियमयुक्त फळे व व्हिटॅमिन डी अवश्य घ्यावे.
० स्ट्रोक : पुरुषांपेक्षा ६६% जास्त केसेस : – इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या रिपोर्टतुसार दर १ लाख पुरुषांमध्ये १९७ तर दर १ लाख महिलांमध्ये १७८ स्ट्रोकच्या समस्या झाल्या. अर्थातच पुरुषांपेक्षा ६६% जास्त.
» कारण : – गर्भावस्थेदरम्यान ब्लडप्रेशर वाढते. ज्यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते. काही गर्भनिरोधक गोळ्या ही ब्लडप्रेशर वाढवतात. मायग्रेनमुळेही याची शक्यता वाढते.
» कसा टाळावा : – ब्लडप्रेशर व शुगरवर नियमितपणे लक्ष ठेवावे. औषध नियमितपणे घ्यावीत.
० कॅन्सर : स्तनपान न करवणे, हायफॅट डाएट
मुख्य कारण : – अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अहवालानुसार ब्रेस्ट कॅन्सर, कोलोरेक्टल इंडीमेट्रिअल, फुफ्फुसाचा कॅन्सर, सर्व्हायकल, स्किन आणि ओव्हरियन कॅन्सर असे आहेत जे पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त होतात.
» कारण : – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रि्व्हेशन अँड रिसर्चनुसार हायफॅट डाएट, स्थूलता, उशिरा विवाह, मुले न होणे वा कमी होणे आणि स्तनपान न करवणे महिलांमध्ये कॅन्सरची प्रमुख कारणे असू शकतात.
» कसा टाळावा : – १0 ते ४0 वर्षे वयात गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी लसीकरण अवश्य करवून घ्यावे. ज्यांच्या कुटुंबात पूर्वी एखाद्या ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून पंचेचाळिशी नंतर मेमोग्राम करवायला हवी.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम