आमदार विखे यांचे खळबळजनक विधान ! म्हणाले मुख्यमंत्री…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :-  आयकर विभागाने १ हजार ५० कोटी रुपयांच्या समोर आणलेल्या घोटाळ्यात ‘कोणाला लक्ष्मी प्रसन्न झाली आणि कोणाचे हात सोन्याने पिवळे झाले’ हे लवकरच समोर येईल

असे सूचक विधान भाजप आमदार राधाकृष्ण विखे यांनी करुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारचा रिमोट कंट्रोलही आता दुसऱ्यांच्या ताब्यात गेल्याने मुख्यमंत्री हतबल झाल्याची टीका त्यांनी केली.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदिपन सोहळ्यानंतर आमदार विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सत्तेवर आल्यापासुनच महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या विळख्‍यात अडकत आहे.

या घोटाळ्यांवरुन जनतेचे लक्ष विचलित करुन, केवळ दिशाभूल करण्‍याचे काम मंत्र्यांकडून सुरु अाहे. सोमवारचा महाविकास आघाडीचा बंद हा त्याचसाठी होता.

परंतू राज्यातील जनतेने या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद दिला नसल्याचा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्‍टाचाराची मालिकाच समोर आली आहे.

राज्याच्या इतिहासात गृहमंत्री फरार झाल्याची घटना प्रथमच घडली आहे. यावरूनच या सरकारचा कारभार जनतेच्‍या हिताचा राहिला नसल्याची टीका आमदार विखे यांनी केली.

उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेचे समर्थन नाहीच. परंतू या घटनेतील वास्तविकता चौकशीतून समोर येईलच.

या घटनेचे भांडवल करुन, महाराष्ट्र बंद करण्याचा महाविकास आघाडीचा खटाटोप हा नाकर्तेपणा दाखवणारा ठरला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe