शहरात भर दिवसा चोरीच्या घटना वाढल्या; पोलिसांसमोर तगडे आव्हान उभे

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :-  नगर शहरातील तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत आज चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहे. या घटनांमध्ये तब्बल आठ लाख रूपयांची रोख रक्कम लंपास झाल्याने खळबळ उडाली आहे.

पहिली घटना…. सादीक शेख (रा. गोविंदपुरा) हे त्यांच्याकडील पाच लाख रूपयांची रक्कम दुचाकीच्या डिक्कीमध्ये घेऊन नगर-मनमाड रोडवरील एका बँकेमध्ये भरण्यासाठी गेले होते.

बँकेत जाण्यापूर्वी त्यांनी बँकेजवळील एका हॉटेलच्या बाहेर दुचाकी उभी केली. ते हॉटेलमध्ये जाताच चोरट्यांनी डिक्कीचा लॉक तोडून त्यातील पाच लाखांची रोकड लंपास केली.

याबाबत शेख यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुसरी घटना अशोक शिवलाल गांधी (वय 74 रा. बुरूडगाव रोड) यांनी मंगळवारी दुपारी मार्केट यार्ड येथील मर्चंट बँकेतून तीन लाख रूपयांची रक्कम काढली.

ती रक्कम एका बॅगमध्ये घेऊन ते कारने घराकडे गेले. तिर्थकार कॉलनीमध्ये कार आल्यानंतर रक्कम असलेली बॅग त्यांनी कारमधून बाहेर काढली.

त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गांधी यांच्या हातातील बॅग बळजबरीने हिसकावून धूम ठोकली. दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

शहरात भर दिवसा चोरीच्या घटना घडल्यामुळे व्यावसायिकांमध्ये खबराट पसरी असून पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe