अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- वसंतराव नाईक मरावाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत आदित्य कृषी महाविद्यालय बीड यांचा ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक जोड कार्यक्रम २०२१ अंतर्गत,
कांचन खाडे हिने पारगाव येथे शेतकऱ्यांना घरगुती निंबोळी अर्क कसा तयार करावा यांच्या संदर्भात मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.

यासोबतच तिने कीटकनाशन फवारताना करताना औषधे कसे हाताळावेत, फवारणी करताना सुरक्षेसाठी कसे कपडे घालावे, सुरक्षा किट कशी तयार करावी व काय काळजी घ्यावी याविषयीही मार्गदर्शन केले.
यावेळी तिने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाचे निरसरण केले. यावेळी विष्णू डोळे, विजय खाडे, राहुल खाडे, युवराज खाडे, विकास खाडे, अजय गर्जे,
महादेव खाडे, सुभाष खाडे, दिलीप डोळे आदी शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी तिला महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. ए. टी मुंडे, डॉ. सी. वी गोपाळ व प्रा. राहुल माळवे यांचे मार्गदर्शन लाभले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम