अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्हा हा सध्या गुन्हेगारीचा अड्डा बनला आहे. वाढत्या चोर्या, दरोडे, लूटमार यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.
यातच बुधवारी भल्या पहाटे बालिकाश्रम रोड येथील आर्यन गार्डन या बिल्डींगमधील चोरीचा प्रयत्न सीसीटिव्हीत कैद झाला आहे. यामुळे परिसरात कमालीची भीती निर्माण झाली आहे.
नगर शहरात सध्या चोरटे भलतेच सक्रीय झाले आहेत. आज पहाटे तीन वाजता बालिकाश्रम रोड येथील आर्यन गार्डनमध्ये चोरटे बिनधास्त घुसताना दिसत आहेत.
यावेळी पार्किंग व जिन्यातील लाईट बंद करून चोर संपूर्ण बिल्डींगमध्ये फिरत होते. त्यांनी काही घरांच्या कड्या बाहेरून लावल्या होत्या. हा प्रकार सकाळी लक्षात आला.
दरम्यान, बालिकाश्रम रोडवरील एका मेडिकलवर याच काळात चोरी झाली. तेथून चोरट्यांनी ८० हजारांचा ऐवज लंपास केला. ऐन सणासुदीच्या तोंडावर चोरटे सक्रीय झाल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
मात्र नागरिकांनाही सावध होण्याची वेळ आली आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला असून पोलीस गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम