धक्कादायक ! नव्याने 13 गावांत कोविड लॉकडाऊन लावण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 10 दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने 69 गावांत लॉकडाऊन लावला होता. यातील 61 गावात करोना नियंत्रणात आला असल्याचे दिसून येत आहे.

मात्र उर्वरित आठ गावांत रुग्ण कमी झाले. मात्र, ते पूर्णपणे थांबलेले नाहीत. यामुळे या आठ गावांसह नव्याने 13 गावांत कोविड लॉकडाऊन लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.

लॉकडाऊन लावलेली गावे… वीरगाव, सुगाव बु., कळस बु. (अकोले), टाकळी (कोपरगाव), चांदा (नेवासा), जामगाव, वासुंदे (पारनेर), वेल्हाळे, उंबरी, चंदनापुरी, वडगाव पान, राजापुर, नांदुरी दुमला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बु, जोर्वे (संगमनेर), लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ (श्रीगोंदा), पिंपळगाव माळवी (नगर) या गावांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 20 पेक्षा अधिक सक्रिय करोना रुग्ण असणार्‍या गावात प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करणे, बॅरिकेटींग करणे, पोलीस बंदोबस्त वाढविणे, जनता कर्फ्यूच्या माध्यमातून गाव बंद करणे, गावातील नागरिकांचे प्राधान्याने 100 टक्के लसीकरण करणे, कोविड नियमानूसार वर्तणूक ठेवणे, चाचण्या वाढविणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत.

मात्र, असे असतांना दहा पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असणार्‍या गावात या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले.

यामुळे करोना सक्रिय करोना रुग्ण असणार्‍या गावात अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडिकल, करोना चाचणी केंद्र वगळता अन्य सर्व 14 ऑक्टोबरला पहाटे 1 वाजल्यापासून ते 23 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News