कामात सुधारणा करा आणि जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवा… ऊर्जामंत्री तनपुरेंनी भरली तंबी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदा पंचायत समिती सभागृहात ऊर्जा व आदिवासी खात्याशी निगडित प्रश्नावर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकी दरम्यान ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विविध कामाच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले.

यावेळी बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले कि, ऊर्जा खात्याची मान शरमेने खाली जात असेल तर ही बाब गंभीर आहे. दोन महिन्यात तुमच्या कामात सुधारणा करा आणि जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवा असे स्पष्ट निर्देश तनपुरे यांनी दिले आहे.

श्रीगोंदा तालुक्यात आदिवासी विकास खात्याकडून खावटी वाटप करण्यात आले त्यावर श्री. तनपुरे म्हणाले, आदिवासी समाजाच्या तुलनेत तालुक्यात खावटी वाटप कमी असून आदिवासी लोकांना या योजनेचा लाभ मिळत नसेल तर ही बाब योग्य नाही.

आदिवासी समाजाच्या लोकांना दाखले नसल्याच्या मुद्यावर बोलताना तनपुरे यांनी प्रांताधिकारी यांना संबधित आदिवासी लोकांचे दाखले स्थळ पाहणी करून दाखल करून घ्या.

त्याबाबत कॅम्प आयोजित करून तिथे दाखले देण्याच्या सूचना केल्या. या बैठकीला आ. बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार,

राजेंद्र नागवडे, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, नंदकुमार दुधाळ, सभापती गीतांजली पाडळे, हरिदास शिर्के उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe