अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची घोषणा केली. मात्र लसीकरणाचा निर्णय लवकर होत नसल्याने मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे लसीकरण तातडीने करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार काही शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून काही विद्यार्थ्यांना थंडी, ताप येणे यात वाढ झाली आहे. अनेक शाळांमध्ये विशेष काळजी घेतली जात नाही.
तर काही शाळा परिसर अतिवृष्टीमुळे दलदलीचा बनला आहे. शाळा परिसरात पावसामुळे गवत, पाणी साचले आहे. यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच शाळांचा परिसर स्वच्छ नाही. त्यामुळे मलेरिया सारख्या साथ आजारांची भर पडत आहे. आरोग्य विभागाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या लसीकरण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी.
ग्रामपंचायत स्तरावर डांसाची फवारणी करावी. जेणेकरून सर्वाचे आरोग्य सुरक्षित राहील, अशी मागणी काही ग्रामस्थ, पालकांनी केली आहे. आरोग्य विभागाने १२-१८ वयोगटातील मुलांसाठी तातडीनेलसीकरण करावे. चांदा प्राथमिक आरोग्य विभागाने ही मोहीम घरोघरी जाऊन करावी, अशी मागणी चांदा येथील किरण जावळे यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या लसीकरण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. ग्रामपंचायत स्तरावर डांसाची फवारणी करावी. जेणेकरून सर्वाचे आरोग्य सुरक्षित राहील, अशी मागणी काही ग्रामस्थ, पालकांनी केली आहे.
आरोग्य विभागाने १२-१८ वयोगटातील मुलांसाठी तातडीनेलसीकरण करावे. चांदा प्राथमिक आरोग्य विभागाने ही मोहीम घरोघरी जाऊन करावी, अशी मागणी चांदा येथील किरण जावळे यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम