अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- नागपूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीचे अहमदनगर शहरातील एका युवकाशी सोशल मीडिया वर मैत्री झाली. त्यांनतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले.
मात्र ही बाब घरी समजल्यानंतर घरच्यांच्या विरोधामुळे दोघांना ब्रेकअप करण्यास सांगितले. मात्र या प्रकाराने संतापलेल्या मुलाने संबंधित मुलीसोबतचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी केली.
दरम्यान, मुलीने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी मुलाला अहमदनगर येथून अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित युवती नागपूर येथे शिक्षण घेत असताना सोशल मीडियावरून तिची अहमदनगर येथील अमर शिंदे याच्यासोबत ओळख झाली.
त्यानंतर त्यांनी एकमेकांची भेट घेत लग्न करायचे ठरविले व सोबत फोटोही काढले. परंतु, ही बाब पीडित मुलीच्या घरच्यांना कळताच त्यांनी तिला त्याच्याशी संबंध ठेवायचे नाही असे सांगितले.
तिनेसुद्धा त्यास तसे सांगितले. हाच राग मनात ठेऊन त्याने रागाच्या भरात तिच्यासोबतचे वैयक्तिक फोटो व्हायरल करुन तिची बदनामी केली.
त्यामुळे पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिस स्टेशन कारंजा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी एक पथक अहमदनगर येथे रवाना करीत अमर शिंदेला अटक केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम