अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली अनेक महिने लालपरीची धाव हि रोखण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी बससेवा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
मात्र जिल्ह्यातील आदिवासी भाग म्हणून परिचित असलेला अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील एस.टी.बससेवा बंद असून बससेवा पूर्ववत सुरु कराव्यात अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांना दूरध्वनीवरून माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केली आहे.
रतनवाडी सह दहा गावातील आदिवासी ग्रामस्थ माजी मंत्री मधुकर पिचड यांना भेटले व बस बंद असल्याने त्यांनी अडचणीचा पाढा वाचला. दरम्यान ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत पिचड यांनी थेट परिवहन मंत्री परब यांना कोळ फिरवला.
यावेळी त्यांनी फोनद्वारे वरुन झालेल्या चर्चेनुसार अकोले (जि. नगर) तालुक्यातील गेल्या कित्येक वर्षांपासून एस.टी.बससेवा सुरु होती. परंतु कोरोनाच्या काळामध्ये एस.टी.बससेवा बंद झालेली आहे. याबाबत आगार व्यवस्थापक अकोले,
यांना विचारणा केली असता ते वारंवार डिझेल शिल्लक नसल्यामुळे बंद असलेल्या एस.टी.बससेवा सुरु करता येत नाही असे कारणे सांगत आहे. यामुळे अनेक दिवसांपासून आदिवासी भागातील विद्यार्थी व जनतेला या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या शाळा सुरु आहेत.
महाविद्यालये दि.२० ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. एस.टी.बससेवा सुरु नसल्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्याथ्र्यांना जाता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे. ही अत्यंत महत्वाची बाब आहे.
आदिवासी भागामध्ये एस.टी.बससेवा वगळता इतर दळणवळणाची कोणतेही साधन नाही. हि बाबा निदर्शनास आणून दिली आहे. हा प्रश्न गंभीर घेत तातडीने या ठिकाणची बससेवा सुरु करावी अशी विंनती केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम