अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड भारतात वाढत चालला आहे आणि आता लहान शहरे आणि गावातील लोक सुद्धा शॉपिंग साईट्स वरून ऑनलाईन वस्तू खरेदी करत आहेत.
पण या दरम्यान, अशा काही बातम्या बाहेर येतात ज्यामुळे सामान्यांना पुन्हा ऑनलाइन खरेदी करावी की नाही असा संभ्रम निर्माण होतो.
अलीकडेच, फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये अँपल आयफोन 12 ऑर्डर केल्यावर निरमा साबण मिळवण्याच्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
त्याच वेळी, मिंत्राचे नाव देखील अशाच गोंधळात अडकलेले दिसते. मिंत्रा वरून चुकीच्या वस्तू आल्याचा आरोप एका ग्राहकाने केला आहे आणि ग्राहकाने मिंत्रा वरून ऑर्डर केलेल्या
मालाचा संपूर्ण तपशील आणि मिंत्रा द्वारे वितरित केलेल्या वस्तूं आणि नंतर चुकीच्या डिलिव्हरीची माहिती देण्यासाठी मिंत्राबरोबर साधलेल्या सवांदाच्या स्क्रीनशॉटसह सर्व गोष्टी ग्राहकाने फोटोसह ट्विटरवर शेअर केल्या आहेत.
ग्राहक म्हणतो की त्याने मिंत्रा वर स्वतःसाठी मोजे मागवले पण त्या बदल्यात त्याला मुलींची ब्रा मिळाली. आणि आता कंपनी ती परत घेण्यासही नकार देत आहे.
सॉक्सच्या बदल्यात ब्रा मिळाली
कश्यप नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर हँडल @LowKashWala द्वारे संपूर्ण घटना शेअर केली आहे. कश्यपने सांगितले आहे की त्याने मिंत्रा या शॉपिंग साइटवर डेकाथलॉन ब्रँड फुटबॉल स्टॉकिंग्जची ऑर्डर दिली होती.
12 ऑक्टोबर रोजी कश्यपच्या पत्त्यावर मिंत्रा पार्सल देण्यात आले. पण जेव्हा कश्यपने हे पॅकेट उघडले तेव्हा त्याला त्यात ट्रायम्फ ब्रँडची 34C साईज ब्लॅक ब्रा सापडली.
चुकीची वस्तू मिळाल्यावर कश्यपने मिंत्राकडे तक्रार केली पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा कश्यपने मिंत्राद्वारे चुकीच्या वस्तू पाठवल्याबद्दल तक्रार केली, तेव्हा त्याला सांगण्यात आले की कंपनी आता ती वस्तू परत घेऊ शकत नाही.
तक्रार न ऐकल्यानंतर कश्यपने ही गोष्ट ट्विटरवर शेअर केली आहे. शॉपिंग साइटवर विनोद घेत ग्राहकाने लिहिले आहे की आता मी फक्त ही ब्रा घालून फुटबॉल खेळायला जाईन. त्याचवेळी, या ट्विटवर इतर अनेक वापरकर्त्यांनीही कश्यपसोबत घडलेल्या घटनेवर मिंत्राच्या चुकीवर विनोद केले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम