महत्वाची बातमी ! टीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- आरोग्य विभागातील कर्मचारी भरती परीक्षेपाठोपाठ आता शिक्षक पात्रता परीक्षेचाही (टीईटी) सावळा गोंधळ सुरू आहे. “टीईटी’ परीक्षा तिसऱ्यांदा लांबणीवर पडणार आहे.

या आधीच्या वेळापत्रकानुसार 30 ऑक्टोबर रोजी होणारी ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता 21 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

या परीक्षेच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल करण्यात आल्याने परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवारांकडून असंतोष व्यक्त होत आहे. याआधी 10 ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा नियोजित होती.

मात्र त्या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने परीक्षेच्या तारखेत बदल करुन 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचे ठरले.

मात्र या दिवशी देगलूर-बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने परीक्षेची तारीख पुन्हा बदलली असून आता 21 नोव्हेंबर रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

मात्र उमेदवारांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण आहे. टीईटी परीक्षेला राज्यातून 3 लाख 30 हजार 642 उमेदवार बसणार आहेत. यासाठी 5 हजार परीक्षा केंद्राचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे.

राज्यभरात होणारी ही परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सुधारीत वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!