अहमदनगर जिल्ह्यातील या बाजार समितीत कांद्याला 3000 रुपये भाव

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल गुरुवारी कांद्याच्या 3093 गोण्यांची आवक झाली.

कांद्याला प्रतिक्विंटलला 3000 रुपये भाव मिळाला. डाळिंबाला 150 रुपये प्रतिकिलोचा व सोयाबिनला 5300 प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत कांदा नं. 1 ला 2600 ते 3000 रुपये असा भाव मिळाला. कांदा नं. 2 ला 18.50 ते 2550 रुपये असा भाव मिळाला. कांदा नं. 3 ला 900 ते 1800 रुपये भाव मिळाला.

गोल्टी कांद्याला 2000 रुपये ते 2300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 200 ते 800 रुपये भाव मिळाला.सोयाबिनची 138 क्विंटल आवक झाली. सोयाबिनला कमीत कमी 4850 ते जास्तीत जास्त 5300 रुपये व सरासरी 5125 असा भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News