१३ वर्षीय मुलीचा बालविवाह दोनदा लावण्याचा प्रयत्न

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :-  पाथर्डी तालुक्यातील ढगेवाडी येथील तेरा वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात नगरच्या चाइल्डलाइनला व पाथर्डी पोलिसांना यश आले.

१७ ऑक्टोबर हा बालविवाह थांबवण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही केली. त्याच मुलीचा विवाह नंतर बीडमध्ये होत असल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे बीडच्या चाइल्डलाइनला माहिती दिल्याने त्यांनी पोलिसांच्या मदतीने हा विवाह पुन्हा रोखला. नगरमधील कारवाईत मुलीच्या पालकांनी दुसरीच १७ वर्षीय मुलगी दाखवली आहे.

याचा खुलासा करण्यासाठी स्थानिक ग्रामसेवक आणि सरपंचांना सांगितले. त्यांनी घरी भेट दिली. पण मुलीचे पालक आणि मुलगी गायब होते.

ही बाब चाईल्डलाईनच्या टीम मेंबर प्रवीण कदम यांना कळवण्यात आली. या मुलीचा विवाह कुर्ला, ता. जि. बीड येथे होणार असल्याचे समजले.

त्यामुळे नगर चाइल्डलाइनने बीड कार्यालयाशी संपर्क साधून बालविवाहाची माहिती दिली. त्यांनी बीड पोलिस ठाण्याचे पीआय उबाळे यांच्या मदतीने हा बालविवाह रोखला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe