अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टी नंतर दक्षिण तालुक्यामध्ये मोठे नुकसान झाले होते.
या भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दोन वेळा दौरे निश्चित झाले मात्र ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. अखेर पालकमंत्र्यांना नगर जिल्ह्याच्या दौऱ्याला मुहूर्त सापडला असून, शुक्रवार व शनिवारी या दोन दिवसाच्या दौऱ्यावर हसन मुश्रीफ येत आहेत.
शुक्रवारी सकाळी सात वाजता मुंबई येथून अकोले तालुक्याकडे रवाना होतील. अकोले तालुक्यातील विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार असून,
२३ ऑक्टोबरला शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते उद््घाटन होणार आहे. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी व कोरोना स्थितीचा आढावा ते घेणार आहेत.
गटनेते जालिंदर वाकचौरे म्हणाले, अनेक महिन्यापासून पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली नाही.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. आतातरी जिल्हा नियोजन समितीची बैठक घ्या, असे सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम