सततची चेष्ठा पडली महागात ; तलाठ्यांमध्ये फ्री स्टाईल मारहाण

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर तहसील कार्यालयात चक्क दोन तलाठ्यांमध्येच जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. एक तलाठी वारंवार करत असलेल्या चेष्टा यामुळे संतप्त झालेल्या दुसऱ्या तलाठ्याने त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दरम्यान या विषयाची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत होती. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर शहरात कार्यरत असलेला एक तलाठी तालुक्यातील एका गावातील दुसऱ्या तलाठ्याची कायम चेष्टा करून त्याला वाईट वागणूक देत होता.

योगायोगाने या दोन्ही तलाठ्यांची गाठ तहसील कार्यालयात झाली. यातील एका तलाठ्याला नेहमीप्रमाणे चेष्टा करण्याचा मोह आवरला नाही. त्याने चेष्टा सुरू केली.

यामुळे संतापलेल्या तलाठ्याने या तलाठ्याची चांगलीच धुलाई केली. तहसील कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला या हाणामारीची माहिती समजताच त्याने मध्यस्थी करून हा वाद मिटवला.

दरम्यान तहसीलदारांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी दोन्ही तलाठ्यांना जाब विचारण्यात आला. दरम्यान दोन तलाठ्याची मारामारी झाल्याने हा शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe