अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- ज्वारी पेरणीसाठी जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपर्यंत कालावधी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. हा कालावधी आता संपला असून आतापर्यंत अवघी 44 हजार 492 हेक्टरवर ज्वारीची सरासरी 9 टक्के पेरणी झालेली आहे.
ज्वारीचे क्षेत्र घटल्याने त्याचा परिणाम ज्वारीच्या उत्पादनावर होणार असून यामुळे ज्वारीचे दर यंदा गगणाला भिडणार आहे. यंदा चांगल्या पावसामुळे कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी 7 लाख 26 हजार 292 हेक्टरपर्यंत क्षेत्र वाढवले होते.
यात सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारीचे होते. राज्यात नगर जिल्ह्यातील ज्वारी प्रसिध्द असून विशेष करून जामखेड तालुक्यातील खर्ड्यातील ज्वारीला राज्यभरात मागणी असते.
मात्र, यंदा विशेष करून जिल्ह्यात दक्षिण भागात परतीच्या पावसाने दणका दिला. यामुळे यंदा ज्वारी पिकाचे क्षेत्रात 91 टक्के घट आली आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 4 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्र असतांना प्रत्यक्षात जिल्ह्यात यंदा 44 हजार 492 हेक्टरव पेरणी झाली असून त्याची सरासरी अवघी 9 टक्के आहे. यामुळे यंदा ज्वारी चांगलीच भाव खाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम