अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- भाकरी थापण्याचे आंदोलन करून केंद्र सरकारच्या विरोधात टाहो फोडणार्यांनी पेट्रोल डिझेलवर राज्य सरकारने लावलेले कर माफ करून घेण्यासाठी आग्रह धरावा असा सल्ला भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
तालुक्यातील जळगाव आणि वाकडी येथे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सुमारे २ कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.वाकडी येथील आरोग्य केंद्राच्या सुशोभिकारणाचा शुभारंभ करून आ.विखे पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी नर्स आणि आरोग्य कर्मचारी आशा सेविका यांचे कोव्हीड लसीकरण मोहीमेत यशस्वी योगदान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
वाकडी आणि जळगाव येथे बोलताना आ.विखे पाटील यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारच्या विरोधात भाकर्या थापण्याचे आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काॅग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
राज्य सरकार फक्त केंद्राकडे बोट दाखवून मोकळे होते परंतू पेट्रोल डिझेलवर राज्य सरकारनेच ४५ रूपयांचे लावलेल्या कराचे काय असा सवाल उपस्थित करून हे कमी करण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारने पार पाडावी म्हणून आंदोलन करणार्यांनी आग्रह धरला पाहीजे.
कोव्हीड संकटात राज्य सरकारने कोणतीही मदत शेतकऱ्यांना केली नाही.बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्थिक नूकसान केले.राहाता बाजार समितीने मात्र शेती मालाची खरेदी विक्री सुरू ठेवून शेतकऱ्यांना दिलासा दिला असल्याकडे लक्ष वेधून राज्य सरकार फक्त घोषणा करीत असल्याचा आरोप केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व संकटाच्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे सामान्य जनतेला मोठा आधार मिळाला.या संकटाने देशातील तरुणाचे रोजगार गेले आहेत.
अडचणीत आलेल्या अर्थ व्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार उपाय योजना करीत असून आपल्या भागातील तरूण शेतकऱ्यांनी फार्मर्स प्रोडय़ुसर कंपन्यां सुरू करुन रोजगाराची निर्मिती करणयावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी आण्णासाहेब चौधरी मुकुंदराव सदाफळ राजेंद्र लहारे उपसभापती ओमेश जपे,सौ.कविता लहारे सौ.अर्चना आहेर यशवंतराव चौधरी सरपंच शिवाजी साबदे उपसरपंच सौ.जयश्री जाधव बाळासाहेब चौधरी रावसाहेब देशमुख वैद्यकीय अधिकारी सौ.स्वाती घोगरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम