अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी सुरू झालेल्या म्हशींच्या बाजारात पहिल्याच दिवशी २० लाखांची उलाढाल

लोणी- लोणी इथं राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने एक नवं पाऊल उचललं आणि म्हशींचा बाजार सुरू केला. मंगळवारी, २५ मार्चला हा बाजार पहिल्यांदा भरला आणि पहिल्याच दिवशी तब्बल २० लाखांची उलाढाल झाली. विशेष म्हणजे या बाजारातला पहिला व्यवहारच २ लाख ७० हजारांचा झाला. शेतकऱ्यांना आपल्या पशुधनासाठी योग्य भाव मिळावा, हा या बाजारामागचा मुख्य उद्देश आहे. … Read more

शिर्डी विमानतळावर रात्रीही उतरतील विमानं ! आता रात्री येता येणार शिर्डीत, पहाटेची आरती गाठणं सोपं

राहाता: शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली नाईट लँडिंग सेवा अखेर सुरू होत आहे. येत्या ३० मार्च २०२५ पासून ही सेवा कार्यान्वित होणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. पहिल्या टप्प्यात हैदराबाद-शिर्डी विमान रात्री ९:३० वाजता शिर्डी विमानतळावर उतरणार असून, ९:५० वाजता पुन्हा उड्डाण घेणार आहे. आतापर्यंत नाईट लँडिंगच्या केवळ चर्चा होत होत्या, पण … Read more

कारखान्याच्या गट कार्यालयात बोगस डॉक्टरचा दवाखाना!

आश्वी, १९ मार्च २०२५ – कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत परवाना नसतानाही राजस्थानमधील एका बोगस डॉक्टरकडून आयुर्वेदिक उपचार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या आश्वी विभागीय गट कार्यालयात अवैधरित्या दवाखाना सुरु केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. इम्रान अब्दुल खान (रा. भरतपूर, राजस्थान) आणि भरत मधुकर … Read more

तलवारीने वार करून खून करणाऱ्यांना न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहिल्यानगर : राहाता येथील एकाच्या छातीवर तसेच डोक्यात तलवारीने सपासप वार करून, एकाच खून केला होता. या खून प्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राहाता येथील जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, की दि. २३ मे २०२२ रोजी श्रीरामपूर येथील कुकी हॉटेलमध्ये झालेल्या वादातून हा गुन्हा … Read more

शिर्डी मतदार संघाबाबत केलेल्या विधानावर मंत्री विखे पाटील यांची टीका : शिर्डीच्या सुरक्षेसाठी कठोर उपाय योजण्याचे आदेश

४ फेब्रुवारी २०२५ राहाता : “कोणतेही विधान करताना खासदार राहूल गांधी यांनी भान ठेवले पाहिजे.शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध त्यांनी कुठून लावला ? हाच खरा प्रश्न आहे.जनाधार गमावलेले नेते चुकीची विधाने करून जनते समोर येण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा जोरदार टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. खासदार राहुल गांधी यांनी शिर्डी मतदार संघाबाबत … Read more

मंत्री विखे पाटील यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने आज सन्मान

२३ जानेवारी २०२५ राहाता : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानाची पदवी देवून गुरुवारी सन्मानित करण्यात येणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या २६ वा पदवीदान समारंभ गुरुवारी रोजी संपन्न होत असून, राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. … Read more

विखे पाटील आयटीआय येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन

अहिल्यानगर प्रतिनिधी: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या विळद घाट येथील आयटीआयमध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थी जीवनातील खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना उद्घाटन समारंभात “आरोग्यम् धनसंपदा” या म्हणीचे महत्त्व सांगितले गेले. खेळामुळे शिस्त, परिश्रम, संघभावना आणि नेतृत्व गुणांचा … Read more

गोदावरी खोऱ्यात अतिरीक्त पाणी निर्माण करणार ; मंत्री विखे पाटील यांचा निर्धार

७ जानेवारी २०२५ राहाता : गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त पाणी निर्माण करून सिंचनासह दुष्काळी समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देत, महायुती सरकारने कालव्यांच्या दुरुस्तीसाठी १९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच चाऱ्यांच्या कामांसाठी २६० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. आगामी काळात लाभक्षेत्रासाठी रब्बी हंगामात एक आणि … Read more

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता खासदार नीलेश लंके यांची माहीती

नगर-पुणे या१२५किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहीती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. संसदेमध्ये नगर-पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खा. लंके यांनी नगर शहर व … Read more

अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

जिल्ह्याच्या काही भागात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर दि. २५- जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज … Read more

स्व. बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्‍वप्‍न पुर्ण करण्‍याची संधी मिळाली – जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्‍या अतिशय महत्‍वाच्‍या खात्‍याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असून, स्‍व.लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खो-यात आणण्‍याचे स्‍वप्‍न या निमित्‍ताने पुर्ण करण्‍याची संधी मिळाली असल्‍याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. मंत्रीपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्‍यानंतर ना.विखे … Read more

आरे कारे म्हणणारे आता अचानक बाबा दादा म्हणायला लागले, आता कावळ्याच्या आधी पोहोचायला लागले…. थोरातांची विखे पाटील यांच्या होमपीचवर जोरदार फटकेबाजी

thorat and sujay vikhe

अहमदनगर जिल्ह्याचे जर राजकारण पाहिले तर ते प्रामुख्याने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सभोवती फिरताना आपल्याला दिसून येते. हे दोघे नेते एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असून एकमेकांना शह काटशह देण्याची एकही संधी दोघांच्या माध्यमातून सोडली जात नाही. राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम  सुरू आहे व संपूर्ण राज्यात राजकीय … Read more

लंकेची खासदारकी रद्द करावी विखेंची याचिका, औरंगाबाद खंडपीठाकडून खा. नीलेश लंकेंना नोटीस !

lanke vikhe

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्या. किशोर संत यांनी प्रतिवादी नीलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. नीलेश लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून … Read more

‘अपनी सरकार अच्छी सरकार’ हा संदेश प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी पोहोचावा : विजया रहाटकर !

politiks

विरोधकांच्या खोट्या प्रचाराला रोखण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बुथ पासून ते सोशल मिडीयावर वैचारीक लढाई करावी लागणार आहे. लोकाभिमुख कामांमुळे महायुती सरकार सत्‍तेवर येणार असल्याने ‘अपनी सरकार अच्छी सरकार’ हा संदेश घरोघरी योजनांच्या माध्यमातून पोहचवण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी केले. भारतीय जनता पक्षाचे उत्‍तर नगर जिल्ह्याचे अधिवेशन राहता येथे संपन्न झाले. … Read more

व्यक्तीगत टीका करणाऱ्या बोलघेवड्या पुढाऱ्यांच्या टीकेला मी घाबरत नाही, त्यांचे लोकांसाठी योगदान काय ? – ना. विखे पाटील

vikhe patil

राज्यातील महायुतीचे सरकार लोकाभिमुख काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू होता. जिल्ह्याला तीन मंत्री होते. पण जनतेसाठी कोणाचाही उपयोग नाही. एकही योजना जिल्ह्याला आणता आली नाही. आज बोलघेवडे पुढारी येऊन करीत असलेल्या टिकेला मी घाबरत नाही. त्यांचे योगदान तरी काय? तुमच्या आशीर्वादाने मतदार संघाचा विकास पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण … Read more

राज्‍यातील खंडकरी शेतक-यांच्‍या जमीनींबाबत महत्‍वपूर्ण निर्णयात महसूल मंत्री म्‍हणून योगदान देता आल्‍याचे समाधान – मंत्री विखे पाटील!

vikhe

यापुर्वी जिल्‍ह्याला महसूल मंत्रीपद मिळूनही खंडकरी शेतक-यांना न्‍याय मिळू शकला नाही. शेतक-यांना जमीनी मिळाव्‍यात ही त्‍यांची भावनाच नव्‍हती. महायुती सरकारमुळे जमीनी भोगवटा वर्ग एक करुन, विनामोबदला शेतक-यांच्‍या नावावर करण्‍याचा एैतिहासिक निर्णय होवू शकला. अनेक वर्षे चाललेल्‍या या संघर्षात शेतक-यांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी महसूल मंत्री म्‍हणून योगदान देता आल्‍याचे समाधान मोठे असल्‍याचे प्रतिपादन महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण … Read more

संरक्षण सामग्री निर्मिती कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी व राहाता परिसरातील २ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार !

vikhe

राज्य शासन लोकाभिमुख काम करत आहे. शिर्डी एमआयडीसीत संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या कारखान्यास शासनाने मंजुरी दिली असून या कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी व राहाता परिसरातील २ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. महसूल पंधरवडा निमित्त राहाता येथे विविध शासकीय योजनांच्या … Read more