धक्कादायक घटना ! पतीने चक्क उकळते तेल फेकले पत्नीच्या अंगावर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने तिच्यावर उकळते तेल फेकून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरूध्द हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना नागपूरातील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत पंचशीलनगर परिसरात घडली आहे. भावना सतीश भिमटे (वय ३१) असे जखमी महिलेचे तर सतीश सुखदेव भिमटे (वय ३९) असे पतीचे नाव आहे.

भावनाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा सतीषला संशय होता. यावरून त्यांच्या नेहमीच वाद होत. गुरुवारी रात्री भावना झोपली. त्यानंतर सतीश शुक्रवारी भल्या पहाटे उठला.

भावना झोपलेलीच होती. सतीशने घरातील कढईत तेल उकळविले. ती झोपेत असतानाच तिच्या अंगावर हे उकळ‌ते तेल ओतले. यात तिचे हात, पाय, छाती भाजली.

तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. पोलिसांनी या प्रकरणी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe