अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे.
पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं आहे.
राज्य सरकारकडून घेण्यात येणारी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठीची 25 आणि 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
ही परीक्षा आज 24 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली होती. परंतू आजही अनेक परीक्षा केंद्रांवर गोंधळ पहायला मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षेची वेळ झाली तरी प्रश्नपत्रिका मिळाली नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
नाशिकच्या गिरणारे केंद्रावर हा गोंधळ पाहायला मिळाला. प्रश्नपत्रिका न मिळाल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाचे वातावरण होते.
आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दोन दोन वेळा परीक्षा द्यायला यावं लागतंय. सिंधुदुर्ग, बीड मधून विद्यार्थी पुण्यात परीक्षेसाठी दाखल झाले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम