अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- शेताच्या बांधावर इलेक्ट्रीक खांब रोवू न दिल्याचा राग येऊन एका वृद्धास जबर मारहाण करण्यात आली असल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसात पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संजय देवराव गुलदगड, कारभारी देवराव गुलदगड, तसेच शीतल कारभारी गुलदगड, वैशाली संजय गुलदगड व त्यांचे सासरे देवराव मंजाबापू गुलदगड रा.तनपुरे वाडी रोड, राहुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शेताच्या सामाईक बांधावर इलेक्ट्रीक खांब रोवू नका असे वृद्ध व्यक्तीने समजाविण्याचा प्रयत्न केला असता वरील आरोपी यांनी वृद्धास लोखंडी पहार, लोखंडी गज, काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम