अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांची यंदाची दिवाळी गोड होणार असल्याचे दिसून येत आहे.
कामगारांना 16 टक्के दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर कारखाना अतिथी गृहात अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील बोलत होते.
यावेळी आयोजित बैठकीत बोलताना ते म्हणाले कि, कारखाना कामगारांना दिवाळी निमित्त 16 टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच बरोबर 12 टक्के वेतनवाढीसह कामगारांच्या इतर प्रश्नांवर ही सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी घुले पुढे म्हणाले की, सर्वांच्या सहकार्याने मागील हंगामात कारखान्याचा राज्यातील सहकारी साखर कारखानदारीत ज्ञानेश्वरचा तिसरा क्रमांक आला.
या हंगामात ही 16 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून उल्लेखनीय कामगिरी होईल याचा मला विश्वास आहे. मागील हंगामातील ऊस बिलाची रक्कम आपण यापूर्वीच अदा केलेली आहे.
तसेच कामगारांना 16 टक्के बोनसची रक्कम 3 कोटी 56 लाख 86 हजार 128 रुपये बँक खाती वर्ग करण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम