अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- गेल्या २ वर्षांपासून जगाला ज्या रोगाने नुकसान पोहचवण्याचे काम केले आहे या कोरोना रूपी संकटातून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील सुटले नाही.
गेल्या २ वर्षात विविध स्तरांवर सर्वसामान्यांसाठी खुले आम पणे राज ठकरे कोणतीही चिंता न करता जनते साठी काम करत होते. मात्र हे काम करत असताना साहेबांना हजारो लाखोंचे आशिर्वाद देखील लाभले आहे.
या मुळे राज ठाकरे यांना नक्कीच लवकर आराम मिळेल याची आम्हाला खात्री आहे. तरी आज नगरच्या ग्रामदैवताच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन राज यांना स्वास्थ्य लवकरच चांगले होवो यासाठी प्रार्थना करण्यात आली.
घरात बसुन कामं होत नसतात त्या साठी लोकांमध्ये जाणं गरजेचं असतं आणि राज ठाकरेंनी कोणतीही चिंता न करता सर्व स्तरातील लोकांना भेटून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले.
या संकटातून देखील लवकर बाहेर येऊन पुन्हा एकदा ते जोमाने महाराष्ट्रासाठी झोकून देतील असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले. या महाआरती साठी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा , तालुका उपाध्यक्ष संकेत जरे ,
चिचोंडी पाटील ग्रामपंचायत सदस्य संदीप काळे , निखील साबळे , महादेव दहिफळे , शंकर गोरे , आदेश गायकवाड , राहुल वर्मा , प्रविण गायकवाड सर्व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम