अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- निर्बंध शिथिल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाने बाजार समित्यांचा परिसर गजबजू लागला आहे.
शेतातील पिकविलेला माल घेऊन शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होऊ लागले आहे. नुकतेच कांद्याची मोठी आवाक बाजारात होऊ लागली आहे. यातच राहाता बाजार समितीत 3575 गोणी कांद्याची आवक झाली.
कांद्याला जास्तीत जास्त 3000 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाच्या 2111 क्रेटसची आवक झाली. कोणत्या कांद्याला काय भाव मिळाला ? जाणून घेऊ यामध्ये प्रामुख्याने कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 2600 ते 3000 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1850 ते 2550 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 900 ते 1800 रुपये इतका भाव मिळाला.
गोल्टी कांदा 2200 ते 2500 व जोड कांदा 200 ते 800 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची 2111 क्रेट्सची आवक प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 111 ते 155 इतका भाव मिळाला.
डाळिंब नंबर 2 ला 71 ते 110 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 70 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये असा भाव मिळाला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम+