अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा चालू गळीत हंगाम सुरू झाला असून सर्व कारखानदारांनी कोण किती ऊस गाळप करणार ते जाहीर केले आहे.
परंतु एकाही कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी उसाची पहिली उचल जाहीर केलेली नाही. याअनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या सर्व मागण्या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक साखर भालेराव यांनी लवकरात लवकर कारखानदार व संघटनेची बैठक लावून ऊस दरा संदर्भात चर्चा घडवून आणू असे बोलताना सांगितले.
प्रादेशिक सहसंचालक भालेराव यांच्याशी झालेल्या बैठकीत साखर उद्योगाशी निगडित विविध प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली.
‘या’ आहेत प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना प्रति टन 150 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करावे,
चालू गळीत हंगामासाठी कारखाने सुरू होण्याच्या अगोदर पहिली उचल जाहीर करावी,
ऊस वजन काटा मध्ये बाहेरून होणारी छेडछाड रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी,
ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार व कारखान्याचे कर्मचारी यांच्याकडून होणारी पिळवणूक थांबवावी
पुरग्रस्त शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्य क्रमाने तोडण्यात यावा,
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम+