अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- एका 14 वर्षीय मुलाने चार वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरातील कामठी परिसरात (काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे.
या मुलाने पॉर्न व्हिडीओ पाहून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कामठी येथे ही घटना घडली आहे.
आरोपी मुलगा हा 14 वर्षीय असून तो नववीत शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी हा मुलगा आणि त्याती बहीण दोघेच घरात होते. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या 4 वर्षीय मुलीला त्याची बहीण घेऊन आली.
यानंतर आरोपी मुलाने आपल्या बहिणीला फिशपॉट दुरुस्ती करण्यासाठी पाठवले. बहीण घरातून बाहेर पडताच आरोपी मुलाने या चिमुकलीला आपल्या बेडरूममध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला.
यानंतर त्याने तिला घरी सोडलं. यावेळी मुलगी रडत होती. तिच्या आईने याबाबत विचारले असता आरोपी असलेल्या 14 वर्षीय मुलाने सांगितले की,
ती बेडवरुन खाली पडली आणि दुखापत झाली. मग, पीडित मुलीच्या आईने तपासणी केली असता तिच्या गुप्तांगाला दुखापत झाली असून रक्त येत असल्याचं निदर्शनास आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम