अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- बालविवाह करणे गुन्हा आहे. मात्र कोरोनाच्या काळात वर्षेभरात अनेक विवाह झाले. यातील अनेक बालविवाह लावण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी याबाबत वेळेत माहिती मिळाल्याने बालविवाह रोखण्यात आले आहेत.
मात्र अनेकदा मुलीबाळींच्या लग्नात आडकाठी नको म्हणुन बालविवाहाची तक्रार दिली जात नाही. परंतु पाथर्डी तालुक्यातील एका गावात एकाच दिवशी तीन बालविवाह लावण्यात आले.
मात्र याबाबत पोलिसांना माहिती मिळाली अन नवरदेवासह मुलीचे आईवडील व इतर नातेवाईक, मंडपवाले व लग्न लावणारे भटजी यांच्यासह सुमारे३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील एका गावात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन विवाह सोहळे पार पडले मात्र हे सर्व बालविवाह असल्याची माहिती एका व्यक्तीने चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांना दिली.
त्यांनी तात्काळ याबाबत संबंधित गावातील ग्रामसेवकास याबाबत सविस्तर दिली. त्यानुसार ग्रामसेवकाने या माहितीच्या आधारे पोलिसांना कळवले पोलिसांनी तात्काळ दखल घेत या प्रकरणी ३३जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम