अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- सणासुदीच्या काळात वातावरण आनंदी, उत्साही आणि ऊर्जापूर्ण असते. आबालवृद्ध नवीन कपडे घालून सणाचा आनंद लुटत असतात. एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात.
त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं . सणासुदीच्या काळात अतिशय सुंदर आणि नवनवीन कपडे दुकानात सहजपणे मिळतात.
मात्र असे सुंदर सुंदर कपडे घातल्यानंतर काही जणींना आपली त्वचा रूक्ष झाल्यासारखी वाटते. ज्यामुळे सौंदर्याला बाधा येते. ही गोष्ट मनाला लागते.
परिणामी, सणांची मजा कमी होते. तुमची त्वचा चमकदार नसेल किंवा रूक्ष झाली असेल, तर घाबरण्याचं काहीच कारण नाही.
आपल्या सौंदर्यात निर्माण झालेली बाधा अनेकांना चिंतित करते. यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. काही घरगुती उपाय आजमावून तुम्ही तुमची त्वचा चमकदार बनवू शकता आणि सणांच्या आनंदात अधिक भर घालू शकता.
काही घरगुती उपाय : – त्वचा नियमितपणे स्वच्छ करण्यासाठी ओट्स दूध किंवा दह्यात मिसळून नियमितपणे त्वचेवर चोळा. साधारण दहा मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.
मऊ टॉवेलने चेहरा स्वच्छ पुसा. ज्यांची त्वचा शुष्क , आहे त्यांनी दूध किंवा दही, ग्लिसरीन आणि मध एकत्र करून बदामाच्या चुऱ्यामध्ये मिसळून चेहऱ्याला लावावे.
बदाम आणि मध हे उत्तम मॉइश्चराइझर आहे. हंगामी फळांची मजा घ्या. संत्र्यामध्ये सौम्य ब्लिचिंग एजंट असतो. भ स्ट्रॉबेरी त्वचेच्या तेला वर नियंत्रण ठेवते. त्वचेवर आढळणारी खुली रोमछिद्र पूर्णपणे बंद करता येत नाहीत, पण त्यांचं आकुंचन निश्चितच होऊ शकते.
अंड्याचा पांढरा भाग आणि मध यांचं मिश्रण बनवून ते चेहऱ्यावर चोळा. दहा मिनिटांनंतर चेहरा धुवा. यामुळे त्वचेतील खुली रोमछिद्रे आकुंचन पावतील आणि त्वचा घट्ट होईल. या उपायामुळे चेहऱ्यावरील छोटे केस ही नाहीसे होतील.
व्यावसायिक उपचार : – तुमच्याकडे वर सांगितलेल्या उपायांसाठी वेळ नसेल, तर तुम्ही एखाद्या स्पा सेंटर किंवा ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचं सौंदर्य वृद्धिंगत करू शकता.
हल्ली अनेक स्पा सेंटरमध्ये सौंदर्याला चार चाँद चढविण्यासाठी २४ कॅरेट स्वर्ण भस्म आणि नैसर्गिक सामग्री म्हणजे दूध, लिंबू, चॉकलेट आणि गुलाब यांचा वापर करू शकता.
तज्ज्ञांच्या मते, सणांच्या साधारण पंधरा दिवस आधीपासून सौंदर्य उपचारांना सुरुवात करायला हवी. त्वचेवर आलेली चमक टिकवून ठेवण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करायला हवा.
तुम्ही तुमची त्वचा मुलायम, आर्द्र राहण्यासाठी प्रयत्न करा, यामुळे सौंदर्य उपचारांचा परिणाम दीर्घकाळ दिसेल.
संपूर्ण शरीराला सुंदळ आणि कोमल बनविण्यासाठी हळद, चंदनाची पूड आणि दुधाचं मिश्रण बनवून संपूर्ण शरीराला चोळा. शरीरावर एक टॉवेल गुंडाळला.
अशाप्रकारे बॉडी रॅप करण्याचे त्वचेवर चमक तर येतेच, शिवाय रोमछिद्रे ही स्वच्छ होतात. यानंतर पेरूचा गर आणि दही यांचं मिश्रण बनवून चेहऱ्यावर चोळा.
नंतर चेहरा धुऊन टाका किंवा गाजराचा ग! आणि दही यांचं मिश्रण बनवून संपूर्ण शरीरावर चोळा. यामुळे शरीरावरील डाग नाहीसे होण्यास मदत होते.
कोमल त्वचेसाठी : –
हातापायांना नरम आणि मुलायम बनविण्यासाठी गरम पाण्यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल, ग्लिसरीन आणि लिंबाचा रस मिसळून त्यामध्ये हातपाय बुडवून ठेवा. यानंतर बदामाच्या पावडरमध्ये दूध मिसळून त्याने मसाज करा. *
तिळ दुधात मिसळून त्याची पेस्ट करा. हे मिश्रण उटण्या प्रमाणे लावा. या उपायामुळे चेहरा, हातापायावरील धूळ नाहीशी होण्यास निश्चितपणे मदत होते. त्वचा ही चमकदार होते.
तुमची त्वचा तेलकट असल्यास एक चमचा लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये एक चमचा गुलाबजल आणि बारीक चिरलेला पुदिना मिसळा. हे मिश्रण एक तास मुरू द्या. त्यानंतर चेहऱ्यावर २0 मिनिटांसाठी लावा. यामुळे चेहऱ्यावरील चिकटपणा नाहीसा होईल.
प्रत्येक प्रकारच्या त्वचेमध्ये चमक आणण्यासाठी थोड्याशा गव्हाच्या कोंड्यात एक चमचा संत्र्याचा रस, एक चमचा मध आणि गुलाबजल मिसळा. ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा. सुकल्यानंतर धुऊन टाका.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम