अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प तरतुदीनसारpवितरीत करण्यास अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी 19 कोटी 50 लाखांचा निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे आगामी काळात विकास कामांना गती प्राप्त होणार आहे.
नगर जिल्ह्यात ना. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, आ. अशोकराव काळे, ना. शंकरराव गडाख, ना. प्राजक्त तनपुरे, लहू कानडे, रोहित पवार,
बबनराव पाचपुते, संग़ाम जगताप, मोनिका राजळे, निलेश लके, डॉ. किरण लहामटे असे 12 विधानसभा सदस्य आणि एक विधान परिषद सदस्य आ. डॉ. सुधार तांबे असे 13 आमदारांचा प्रत्येकी दीड कोटी रूपये प्रमाणे एकूण 19 कोटी 50 लाखांचा निधी उपलब्ध होत आहे.
दरम्यान या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार प्रत्येक आमदारास 1.50 कोटी याप्रमाणे 334 विधिमंडळ सदस्यांना 501 कोटी रुपये वितरीत करण्यात येत आहेत. यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी रखडलेली विकासकामे करण्यास आमदारांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. राज्य सरकारने आमदारांच्या विकास निधीमध्ये एक कोटी रुपयांची वाढ केली आहे.
त्यानुसार आमदारांना स्थानिक विकासासाठी तीन कोटी रुपये मिळणार आहेत. यापूर्वीच प्रत्येकी दीड कोटी प्रमाणे सर्व आमदारांना सरकारने 529 कोटी 50 लाखांचा निधी दिलेला आहे. विधिमंडळ सदस्यांचा स्थानिक विकास निधी हा हक्काचा निधी असतो. तो आपत्कालीन परिस्थितीत तसेच लहान लहान लोकोपयोगी कामांसाठी वापरला जातो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम