शेतकर्‍यांनी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय केला तर निश्चित फायदा होईल – राज्यपाल

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :-  राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राहुरीमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली.

या दरम्यान त्यांनी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांना मार्गदर्शन देखील केले. यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शेतकर्‍यांनी कृषी विद्यापीठाच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनचा (Tलाभ घेत आपल्या कल्पकतेने शेती करत उन्नती

साधली. ही प्रशंसनीय गोष्ट आहे, असे गौरवोद्गार काढत कोश्यारी म्हणाले, काळानुरूप शेतकर्‍यांनी जर शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय केला तर शेती केल्याचा निश्चित फायदा होईल.

शेतकर्‍यांनी सतत सकारात्मक विचार करत काम केले पाहिजे. सेंद्रिय शेती व जीआय टेक्नॉलॉजीचे ज्ञान शेतकर्‍यांनी प्राप्त केले पाहिजे. यातून शेतकर्‍यांना खूप फायदा होईल.

शेतीमधील नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. दरम्यान करोना काळात सर्व बंद होते. मात्र शेती चालू होती.

शेतकरी शेतीत राबत होता, असेही राज्यपाल म्हणाले. तत्पूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या विविध विभागांची पाहणी केली.

यात माहिती व तंत्रज्ञान विभागातील विविध पिकांच्या वाणांची, गायीं व शेळींच्या संकरीत जातींची माहिती जाणून घेतली. तसेच या भेटीदरम्यान त्यांनी काही प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe