अहमदनगर ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नगर जिल्ह्यातील नातेवाईकांवर ईडीची छापेमारी !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आतेभाऊ व राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहराचे सुपुत्र जगदीश कदम यांच्या घरी ईडीने आज सकाळीच धाड टाकली.

त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचे समजते. जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. ते अजित पवार यांचे आते भाऊ आहेत.

कदम हे पुण्यातील सहकार नगरमध्ये राहतात. त्यांच्या घरी आज सकाळीच ईडीने धाड मारली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कदम हे मुंबईतआहेत.

घरी ईडीने धाड मारल्याचं कळताच कदम हे मुंबईहून पुण्याकडे निघाले असल्याचे समजते. दौंड सहकारी साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते.

तर कारखान्यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा खुलासा कारखान्याकडून करण्यात आला होता. त्यानंतरही ईडीकडून धाड मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe