अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील कौठा येथे ४ एप्रिल २०१७ रोजी गाजलेल्या डॉ. विपूल डे यांचा संशयावरून खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी संभाजी महादेव थोरात ( वय ५२, रा. कौठा) याला जिल्हा व सत्र न्यायाधिश एन. जी. शुक्ल यांनी जन्मठेप तसेच दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड. अनिल घोडके यांनी काम पाहिले. तालुक्यातील कौठा येथील डॉ. विपुल डे हे गावात वैदयकीय व्यवसाय व पशुपालनाचा व्यवसाय करत होते व त्यांनी चाऱ्यासाठी खंडाने शेतजमीन घेतली होती.
४ एप्रिल २०१७ रोजी डॉ. विपूल डे हे चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. ते रात्री ९ वाजेपर्यंत परत न आलेने त्यांची पत्नी सुप्रिया डे यांनी गावातील लोकांचे मदतीने शोध घेतला.
परंतु ते मिळून न आल्याने ५ एप्रिल रोजी श्रीगोंदे पोलिस स्टेशनला खबर दिली. त्यानंतर शोध घेतला असता आरोपीच्या शेतीपासून काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी प्रेताची परिस्थिती पाहून डॉगस्कॉड बोलावले असता डॉगस्कॉडने आरोपीच्या घरापर्यंत माग काढला.
मृताची पत्नी यांनी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. या केसचा सखोल तपास पोलिस निरीक्षक सोनी यांनी करत आरोपीला अटक केले.
आरोपीने गुन्हा केल्याची जागा दाखवत गुन्ह्यात वापरलेला दगड तसेच गुन्ह्याच्या वेळी अंगावर असलेले व घरात धूवून लपवून ठेवलेले रक्ताचे कपडे काढून दिले.
पोलिस निरीक्षक सोनी यांनी गुन्ह्यांचा तपास करून आरोपी विरुद्ध दोषारोप न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार, फिर्यादी, पंच, डॉ. सुनील बेलोटे, पोलिस निरीक्षक सोनी,
पोलिस काॅन्स्टेबल अविनाश ढेरे यांनी दिलेल्या साक्षीवरून जिल्हा व सत्र न्यायाधिश एन. जी. शुक्ल यांनी सदर प्रकरणात आरोपी संभाजी महादेव थोरात याला भादंवी कलम ३०२ प्रमाणे जन्मठेप व १० हजार रुपये दंड,
दंड न भरल्यास १ वर्षे सक्त मजुरी तसेच भादंवि कलम २०१ प्रमाणे ५ वर्षे व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. अनिल घोडके यांनी काम पाहिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम