अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- नगर अर्बन बँकेच्या 18 संचालकांच्या जागांसाठी आतापर्यंत 48 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून गुरूवारी नव्याने 20 इच्छुकांनी 79 अर्ज नेले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकरी दिग्विजय आहेर यांनी दिली.
उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी असल्याने निवडणुकीसाठी शंभरहून अधिक अर्ज होण्याची शक्यता आहे.
दरम्यान नगरच्या अर्थकारणात महत्त्वाची संस्था असणार्या नगर अर्बन बँकेची रणधुमाळी चांगलीच तापण्यास सुरूवात झाली आहे.
नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी सहकार पॅनलच्या वतीने माजी संचालकांनी मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केले. यात शहर मतदार संघातून माजी व्हाईस चेअरमन अशोक कटारिया,
शैलेश मुनोत यांनी तर सुरत येथील दिनेश कटारिया यांच्या यांच्यासह संगमनेर शाखा मतदार संघातून अतुल राधावल्लभ कासट, शेवगाव शाखेतून नगरसेवक कमलेश गांधी, कर्जत शाखेतून रासपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र कोठारी यांच्या पत्नी मनीषा कोठारी व मागासवर्गीय संघातून नंदा साठे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी सहकर पॅनलचे नेते सुवेंद्र गांधी, शहर बँकेचे माजी चेअरमन डॉ.विजय भंडारी आदींश विविध क्षेत्रातिल नागरीक व मतदार उपस्थित होते.
तसेच सत्ताधारी गटासोबत विरोधी बँक बचाओ कृती समितीच्या सदस्यांनी उमेदवारी अर्ज काल दाखल केले. यात शहर मतदासंघातून राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा, सीए ज्ञानेश्वर काळे, अच्युतराव पिंगळे,
सुरेश तिवारी, प्रकाश कराळे आणि नेहूल भंडारी यांनी, तर शाखा मतदारसंघातून संजय छिल्लारे (श्रीरामपूर), ईश्वर बोरा (आश्वी), संजय भळगट (सोनई), महिला मतदारसंघातून गिता गिल्डा, अनुसूचित जाती मतदरासंघातून दीप चव्हाण अशा 12 जणांनी उमेदवारी अर्ज भरला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम