अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- दि. २८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळ कर्मचारी संघटनांनी जे आंदोलन केले होते त्यात जो काही निर्णय झाला तो सर्व कामगारांना अमान्य आहे.
त्यांची प्रमुख मागणी रा.प. महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची आहे. परंतु त्याविषयी कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
त्यामुळे रा.प. महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर च्या मध्यरात्री पासून संघटना विरहीत बेमुदत कामबंद आंदोलन व उपोषण करणार आहेत.
त्यांच्या आंदोलनाला श्रीगोंदा भाजपा च्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी आ. बबनराव पाचपुते म्हणाले कि, एस.टी कर्मचाऱ्यांच्या दररोजच्या आत्महत्येच्या बातम्या वाचुन मनाला अत्यंत वेदना होत आहेत.
रा.प. कर्मचारी सुद्धा माणसेच आहेत. परंतु या निगरगट्ट व अकार्यक्षम सरकारला सर्वसामान्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसुन संपूर्ण महाआघाडी सरकार आर्यन खान ला वाचवण्याच्या कामात गुंतले आहे.
सरकारने रा.प. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा गांभिर्याने विचार न केल्यास भाजपा च्या वतीने सरकारला जाग आणण्यासाठी संपुर्ण राज्यभर आंदोलन उभे केले जाईल.
यावेळी श्रीगोंदा भाजपाच्या वतिने तालुकाध्यक्ष संदिप नागवडे, शहराध्यक्ष राजेंद्र उकांडे, यांनी आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे पत्र वाहतुक अधिक्षक स्वप्निल आहेर यांच्याकडे दिले, यावेळी विनय महाजन,संदिप बोळगे,
विशाल जोगदंड, दिलीप बोके, सुहास काळे, निलेश आखाडे, दादासो सांगळे, गजराज कोतकर, पोपट पांढरे, निलेश गोरे, अनिल बोरावके,अशोक घोडके, योगेश शेटे यांसह मोठ्या प्रमाणावर रा.प.कर्मचारी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम