अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर – पुणे महामार्गावर वायरमनला चिरडले !अपघाती मृत्यू मुळे हळहळ..

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा बाबुर्डी रस्त्यावर नवीन एमआयडिसी केएसपीजी कंपनीसमोर गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास दुचाकीवरुन वायरमन वैभव रावसाहेब गायकवाड ( वय २९, रा. जातेगाव, ता. पारनेर) हे सबस्टेशनकडे जात असताना विरूद्ध दिशेने येणाऱ्या टाटा सुमोची जोराची धडक बसून गायकवाड जागीच ठार झाले.

अपघातानंतर चालक फरार झाला आहे हा अपघात इतका भयानक होता की, सुमो गाडी व मोटारसायकलचा मोठा आवाज झाला. यामध्ये वायरमन यांच्या नाका तोंडातून रक्त बाहेर आले.

वायरमन हे गाडीला गुंतल्यानंतरही त्यांना बऱ्याच अंतरावर ओढत नेले. सविस्तर असे की, वैभव गायकवाड हे नगर पुणे महामार्गावरील म्हसणे फाट्यावरुन नवीन एमआयडिसीतील सबस्टेशन वर आपल्या दुचाकी डिस्कव्हर (क्र. एमएच १६, एयू-४५८१)

वरून लाईट दुरुस्तीच्या कामानिमित्त जात होते, समोरून येत असलेल्या टाटा सुमो गाडी (क्र. एमएच-१६ एटी-४९९५) हिची जोराची धडक बसून गायकवाड हे जागीच ठार झाले.

गायकवाड हे परिसरातील पळवे खुर्द, बुद्रुक, जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी या पाच गावात वायरमनचे काम करत होते. लाईटच्या कामाचा अनुभव असणारे एक अभ्यासू आणि तरुण परिसरात चांगली सेवा देणारे व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या अपघाती मृत्यू मुळे हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe