अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- शहर वकील संघटनेच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी आज जिल्ह्य न्यायालयात मतदान झाले व सायंकाळी मतमोजणी झाली.
अतीतटीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. अनिल सरोदे व उपाध्यक्षपदी अॅड. संदीप वांढेकर यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अशोक गुंड यांनी निकाल झहीर केल्यावर जिल्ह्य न्यायालयात वकिलांनी जल्लोष करत गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला.
बिनविरोध होणाऱ्या या निवडणूकीसाठी शेवटच्या क्षणी मतदान झाले. अध्यक्ष व उपाध्यक्ष व्यतिरिक्त इतर जागा बिनविरोध झाल्या. संघटनेचे मावळते अध्यक्ष अॅड.भूषण बऱ्हाटे यांनी नूतन पदाधिकारींचे अभिनंदन केले. अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत उमेदवार अॅड.अनिल सरोदे यांना २५७,
संजय पाटील यांना २५५, तर अॅड.सुधीर टोकेकर यांना ५८ मते पडली. अतीतटीच्या झालेल्या निवडणुकीत अॅड. सरोदे यांनी अॅड.पाटील यांच्यावर दोन मतांनी विजय मिळवला. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अॅड.संदीप वांढेकर यांनी २९२ तर विरोधी अॅड. अनुराधा येवले यांना २७५ मते मिळवली.
अॅड.वांढेकर यांनी १७ मतांनी विजय मिळवला. यावेळी बिनविरोध झालेल्या निवडी पुढील प्रमाणे, सचिव अॅड. स्वाती नगरकर, खजिनदार अॅड.अविनाश बुधवंत, सहसचिव अॅड.अमित सुरपुरिया, महिला सहसचिव अॅड.आरती गर्जे, कार्यकारणी सदस्यपदी अॅड.सागर जाधव व विक्रम शिंदे यांची याधीच निवड झाली होती.
नूतन अध्यक्ष अॅड.अनिल सरोदे म्हणाले, वकील संघटनेच्या निवडणुकीत सर्व वकील सहकाऱ्यांनी केलेल्या अमुल्य सहकार्याने माझी अध्यक्षपदी निवड झाली आहे. आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेत काम करणार आहे. वकिलांचे प्रश्न सोडवण्य बरोबरच नवनवीन उपक्रम राबवणार आहे.
यावेळी विशेष सरकारी वकील सुरेश लगड, अॅड.अमोल धोंडे, अॅड.कृष्णा झावरे, अॅड.चेतन रोहाकले, अॅड.अनिता दिघे, अॅड.राजेश कावरे, माजी अध्यक्ष शहाजी दिवटे, अॅड.लक्ष्मण कचरे, अॅड.बाबासाहेब मावळे, अॅड.योगेश गेरंगे, अॅड.व्ही.आर.भोरडे, अॅड.कानिफनाथ पवार, अॅड.अक्षय कोळसे, अॅड.विक्रम शिंदे आदींसह वकील उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम