अहमदनगर ब्रेकिंग : समृद्धी महामार्गाच्या कामावरील ड्रायव्हरची हत्या !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील भोजडे लौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भोजडे शिवारात वादे यांचे पोल्ट्रीजवळ गाडी ड्रायव्हरला मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली.

कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली. कोपरगाव तालुक्यातील राज्याच्या महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील कामावर काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रस्त्यावरून

डम्परला जाण्यास हरकत घेतली व दिल्ली येथील डंपर चालक जगबिरसिंग रामकिसन सिंग (वय-५६ ) यास आरोपी सचिन सुदामराव खटकाळे (वय-३४) रा.खटकाळेवस्ती लौकी,नितीन सोमनाथ पवार (वय -२३) रा.मयुरनगर भोजडे यांनी खाली खेचून लाथाबुक्कयाने जबर मारहाण जिवे ठार मारले आहे

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. भाजप राजवटीत महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबई-नागपूर या महामार्गाचे काम सुरु केले आहे.राज्यात आघाडी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी या महामार्गाचे नाव बदलण्यात आले आहे.या मार्गाची लांबी ७१० कि.मी.आहे.

सरकारने नागपूर-मुंबई शीघ्र संचार ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.त्याचे काम नागपूरच्या बाजूने आटोपले असले तरी नगर जिल्ह्यात मात्र त्याला मंद गतीने ग्रासले आहे. भोजडे येथे दि.२८ ऑक्टोबर रोजी या विपरीत घटना घडली आहे.

कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीत सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास सुमारास भोजडे लौकी जाणारे रस्त्यावर भोजडे गावचे शिवारात वादे यांचे पोल्ट्रीजवळ घडली आहे. मात्र हे प्रकरण आंदोलनावर नाही तर चालकाच्या जीवावर उठले आहे.याचे समर्थन कोणीही करणार नाही.

मात्र याची दखल शासनास घ्यावी लागणार आहे.यात आरोपी सचिन खटकाळे,नितीन पवार यांनी डंपर बुमप्रेशर गाडी (क्रं.पी.बी.१३,बी.डी.५५६९) हिला अडवून तीचे वरील चालक जगबिरसिंग रामकिसन सिंगरा.बी-२/२०८ बी.-२ ब्लॉक,रोहिणी एक्सटेंशन,

सेक्शन २० नवी दिल्ली-११००८१ यास,”या रस्त्याला खड्डे पडले असुन इकडुन गाडी घेऊन यायचं नाही”, ”तु का आला ? व “समृधी महामार्गाच्या गाडया घेऊन जायच्या नाही” असे सांगुन पण तुझी बुम प्रेशरची गाडी का आणली ? असे म्हणुन मयतास शिवीगाळ करुन

त्याचे पोटात लाथ मारुन जमिनीवर पाडून त्याचे छाती व पोटात लाथाबुक्कयाने जबर मारहाण करुन त्याला जिवे ठार मारले आहे. दरम्यान या प्रकरणी फिर्याद दाखल झाली असून कुंदन सुरेशकुमार महंतो (वय-२५) वर्षे,धंदा-क्लिनर,रा.पडौली,थाना-पुचरुखी,जि.शिवांग,राज्य-बिहार हल्ली रा.तीनचारी,कोकमठाण

यांनी ती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. घटनास्थळी शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक जाधव यांनी भेट दिली आहे.या गुंह्यातील दोन्ही आरोपी अटक केली आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या गुन्हा दाखल केला आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe